सांगली,(प्रतिनिधी)-
आयुक्त
कार्यालयाने सुचवलेल्या ’त्या’ 16 शिक्षकांची
सोयीच्या ठिकाणी बदली करण्यासाठी काल सुनावणी घेण्यात आली. जिल्हा
परिषद ही सुनावणीची प्रक्रिया पूर्ण केली असून रिक्त असणार्या
जागांपैकी त्यांच्या पसंतीची शाळा विचारून घेण्यात आली आहे. मात्र
शैक्षणिक वर्ष संपल्यानंतरच या बदल्या होणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
16 पैकी 14 शिक्षकांनी अपेक्षित
शाळा नोंदवल्या असून दोन शिक्षकांनी आहे त्याच शाळा पसंत असल्याचे सांगितले आहे.
जिल्ह्यात 27 फेब्रुवारी 2017 च्या आदेशानुसार मे 2018 मध्ये झालेल्या प्राथमिक शिक्षकांच्या
जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत अन्याय झाल्याची तक्रार करीत 226 शिक्षकांनी आयुक्त कार्यालयाकडे दाद मागितली होती. त्या
सर्वांची सुनावणी आयुक्त कार्यालयात झाली. त्यापैकी
32 जणांची कागदपत्रे जिल्हा परिषदेकडून मागवली. त्यानंतर आयुक्त कार्यालयाने त्यापैकी 16 शिक्षकांची
यादी जिल्हा परिषदेकडे पाठवून खात्री करून त्यांची सोयीच्या ठिकाणी नियुक्ती करण्याचे
आदेश दिले आहेत.
आयुक्त कार्यालयाच्या आदेशानुसार ही सुनावणी जिल्हा
परिषद प्रशासनाने काल घेतली. ही सुनावणी काल पूर्ण झाली.
त्या सर्व शिक्षकांकडून रिक्त असणार्या जागांपैकी
त्यांना आवश्यक असणारी शाळा नोंदवून घेण्यात आली. त्या ठिकाणी
त्यांची बदली करण्यात येणार आहे. 16 पैकी 14 शिक्षकांनी अपेक्षित शाळा सांगितल्या. मात्र इतके हेलपाटे
मारून, प्रयत्न करून बदलीची संधी मिळाली असतानाही 2 शिक्षकांनी बदली नाकारली असून आहे त्याच शाळांना पसंती दिली आहे. कदाचित रिक्त जागांमध्ये त्यांच्या सोयीची शाळा नसाव्यात. सध्या शैक्षणिक वर्ष अंतिम टप्प्यात आहे. अशावेळी शिक्षकांच्या
बदल्या करणे संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांच्या अडचणीचे होणार आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष संपल्यानंतरच त्या शिक्षकांची बदली प्रक्रिया पूर्ण
होणार आहे. दरम्यान,‘त्या’ 210 शिक्षकांचा निर्णय नाहीच ! अन्याय झाल्याची तक्रार करीत
आयुक्त कार्यालयाकडे धाव घेतलेल्या ‘त्या’ 210 शिक्षकांबाबत मात्र अद्याप निर्णयच झालेला नाही.
No comments:
Post a Comment