Thursday, January 10, 2019

आजपासून विद्युत सुरक्षा सप्ताह


जत,(प्रतिनिधी)-
वीज ग्राहक आणि वीज कर्मचार्यांमध्ये विद्युत सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण व्हावी, ग्राहकांना अपघातविरहित वीज पुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी 11 ते 17 जानेवारी दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. दैनंदिन आयुष्यात लहान-सहान गोष्टी विचारात घेतल्यास विजेमुळे होणारे अपघात हमखास टाळता येणे शक्य आहे. या दृष्टीने या सप्ताहादरम्यान ग्राहक प्रबोधन करण्यात येणार आहे.

 आज अज्ञान किंवा अतिआत्मविश्वास, अतिउत्साहामुळे दरवर्षी वीज अपघातात शेकडो बळी जातात, तर अनेकांना कायमस्वरूपी अपंगत्व येत असते. शे-पाचशे रुपयांच्या वीजचोरीसाठी लाखमोलाच्या जिवाची बाजी लावली जाते. विजेच्या तारांमधे अडकलेला पतंग काढायला जीव धोक्यात घातला जातो. वीज वाहिनीखाली घरांचे बांधकाम केले जाते. वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला जातो. ओल्या हाताने विद्युत उपकरणे हाताळली जातात. या सार्या गोष्टी म्हणजे साक्षात मृत्यूलाच आमंत्रण असल्याने या गोष्टी टाळून अपघातविरहित वीज पुरवठ्याच्या ध्येयात सर्वांनी सोबत करण्याची गरज असल्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
 विद्युत उपकरणे ओल्या हाताने हाताळू नयेत. वीज वाहिनीच्या खाली किंवा जवळ कोणत्याही प्रकारचे बांधकाम करू नये. अर्थिंगची व्यवस्थायुक्त थ्री-पीन असलेलीच उपकरणे वापरावी. परवानाधारक कंत्राटदारांकडूनच घरातील वीज वायरिंग करून घ्यावे. आयएसआय प्रमाणित वीज वायर्स, केबल्सचा वापर करायला हवा. अतिभार किंवा शॉट सर्किटमुळे हानी होऊ नये यासाठी योग्य क्षमतेची एमसीईबी/ एमसीसीबी वापरावी. विद्युत खांब किंवा तणाव तारांना गुरे-ढोरे बांधू नये. विद्युत प्रवाह शेतातील कुंपणात सोडू नये. न्यूट?लसाठी उघड्या तारांचा वापर टाळून इन्सुलेटेड तारांचा वापर करावा. तात्पुरते, लोंबकळणारे वायर्स वापरू नये.



No comments:

Post a Comment