Wednesday, January 23, 2019

उमराणी उपसरपंचपदी बसवराज धोडमनी

जत,(प्रतिनिधी)-
उमराणी ( ता. जत ) येथील ग्रामपंचायत उपसरपंच पदी बसवराज जंगाप्पा धोडमनी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ते काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत. माजी पंचायत समिती सदस्य मल्लेश कत्ती यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

     उमराणी ग्रामपंचायतीची सदस्य संख्या चौदा इतकी आहे. लोकनियुक्त  सरपंच काँग्रेस पक्षाचे आहेत. या चौदापैकी नऊ सदस्य काँग्रेस पक्षाचे असून सहा सदस्य भारतीय जनता पक्षाचे आहेत .भाऊसो घारगे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते .त्या रिक्त पदावर बसवराज  धोडमनी करण्यात आली आहे.
    उपसरपंच पदाची निवड करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या विशेष सभेस  चौदापैकी आठ सदस्य उपस्थित होते .तर भारतीय जनता पक्षाचे सर्व सदस्य गैरहजर होते. सरपंच जयश्री शिंदूर यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली .ग्रामसेवक सुरेश वाघमारे, सदस्य तानिबाई अभंगे, कलव्वा येरमळी , कांता कांबळे ,रेश्मा मिरजी , रामराव पांढरे, मल्लाप्पा मैगूर , भाऊसो घारगे,व अमरसिंह इंगोले , सागर कांबळे धनाप्पा बिराजदार इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment