Monday, January 14, 2019

शिक्षक भारतीतर्फे सावित्री-फातिमा आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर


जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुका शिक्षक भारतीच्या वतीने जत तालुक्यातील 28 केंद्रातील प्रत्येकी एका सावित्रीच्या लेकींचा सावित्री-फातिमा आदर्श शिक्षिका पुरस्कार हे राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त पुरस्कारने गौरविण्यात येणार असल्याची माहिती जत तालुका अध्यक्ष दिगंबर सावंत यांनी दिली.

 धानम्मा ईश्वरप्पा बोर्गी (उमदी), ललिता सिद्धाण्णा रुगीम उटगी, प्रतिभा फकिरप्पा काराजनगी (जादरबोबलाद), सुनीता किसन कोकणी (सनमडी), श्रीमती संगीता महारुद्र टक्कलकी (कोंतवबोबलाद), आशादेवी लकाप्पा कोळी (गिरगाव), अनिता अशोक अग्निहोत्री (बोर्गी), गीतादेवी रावसाहेब पाटील (संख), हेमलता दत्तात्रय गुळवे (आसंगी तुर्क), सोनाली भीमराव व्हनखंडे (गुड्डापूर), मंजुषा हरिश्चंद्र चव्हाण (मुचंडी), सुरेखा अशोकराव जाधव (वळसंग), अलका विलास कांबळे (खोजनवाडी), भारती अरविंद उदगिरे (सिंदूर), रमल बबन जाधव (बिळूर), पुष्पा महादेव सुतार (जिरग्याळ), अमिना जिलामी मुल्ला (डफळापूर), सुप्रिया प्रेमानंद रंगारी (बाज), छाया सुबराव भोर (कुंभारी), अश्विनी अशोक कांबळे (वाळेखिंडी), अभिलाषा आनंद शिंदे (शेगाव), सीमा तुकाराम कुलकर्णी (बनाळी), उषा ज्ञानदेव बनसोडे (आवंढी), वंदना आणू यलमल्ले (अचकनहळ्ळी), मीनाक्षी मलाप्पा निडसोसी (तिकोंडी), शांताबाई धोडाप्पा मोर्डी (दरीबडची), हसीना अन्सार शेख (जत कन्या.) सुनिता उमाजी हिले (निगडी खुर्द) हा पुरस्कार शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते व नवनाथ गेंड, स्वाती भेंडभर, महेश शरनाथे, कृष्णा पोळ आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी नवनाथ संकपाळ शौकत नदाफ, अविनाश सुतार दयानंद रजपूत, बाळासाहेब सोलनकर, मल्लया नांदगाव, दशरथ पुजारी, भाऊसाहेब महानोर, गणपती खांडेकर, जितेंद्र बोराडे, हाजी पठाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment