Friday, January 11, 2019

वाळू वाहतुकीच्या दोन ट्रकवर कारवाई


 सांगोला,(प्रतिनिधी)-
कोळा येथे अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणार्या दोन ट्रकवर कारवाई करुन सांगोला पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई विशेष पथकाने केली असून राजेंद्र भोसले (रा. रांजणी, ता. कवठेमहांकाळ), सचिन कुंभार (रा. शिरढोण, ता. कवठेमहांकाळ), तानाजी गवळी (रा. भालेवाडी, ता. मंगळवेढा), उमेश घाडगे (रा. कवठेमहांकाळ), विश्वास सकट (रा. कोळा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
या कारवाईत दोन ट्रक व आठ ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. सदरची कारवाई गुरुवारी दुपारी 3.30 च्या सुमारास कोळा ते जुनोनी रोडवर कोळे गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर करण्यात आली.

No comments:

Post a Comment