जत,(प्रतिनिधी)-
सांगली कृषी उत्पन्न बाजार
समितीच्या वतीने जत जनावरे बाजार आवारात उभारलेल्या
व्यापारी संकुल दुकान गाळ्यांचे लिलाव करून वाटप करण्यात यावे अशी मागणी आमदार विलासराव जगताप यांनी सहकार मंत्री सुभाष देशमुख व पणन
राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, जत जनावरे बाजार आवारात 24 व्यापारी दुकान गाळे तयार
करण्यात आले आहेत. हे
व्यापारी संकुल विजापूर ते सातारा राष्ट्रीय महामार्गावर असल्याने या गाळ्यांना मोठ्या
प्रमाणात मागणी होत आहे. गाळे घेण्यासाठी स्पर्धा लागली आहे. तालुक्यातील काही संचालकांनी लिलाव न करताच गाळे वाटप करण्याचे धोरण आखले आहे
असे समजते. आपल्या मर्जीतील लोकांना व आर्थिक देवाण घेवाण करून
गाळे वाटप करण्याचा घाट घातला जात आहे. यामुळे बाजार समितीचे
लाखो रूपयांचे उत्त्पन्न बुडणार आहे. अशी तक्रार या निवेदनात
करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment