उमराणी ( ता. जत ) येथील जय हनुमान विकास सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी धनगोंंडा मलगोंडा बिराजदार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे .सोसायटीवर काँग्रेस पक्षाची सत्ता असून बिराजदार हे माजी पंचायत समिती सदस्य मल्लेशी कत्ती समर्थक आहेत.
ईश्वर वठारे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते .या रिक्त पदावर बिराजदार यांची निवड करण्यात आली आहे .निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जत ए.एम.यशवंत यांनी काम पाहिले. बिराजदार यांची निवड जाहीर झाल्यानंतर चंद्रसेन खर्डेकर , मल्लेश कत्ती , अमरसिंह इंगोले ,काशिनाथ माळी ,विजय शिंदे, यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी श्रीमंत भिरडी, कलीमोहम्मद अपराध, अण्णाराया येळदरी इत्यादी मान्यवर व सभासद उपस्थित होते .
No comments:
Post a Comment