Friday, January 11, 2019

चारा छावणी सुरु न केल्यास बेमुदत उपोषण -सचिन मदने

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात भीषण दुष्काळ पडूनदेखील शासन कोणत्याही उपाययोजना करीत नाहीत.पशुधन संकटात आले असतानाही चारा छावण्या सुरु केल्या नाहीत.जर चारा छावण्या सुरु न केल्यास जत तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा भटक्या विमुक्त जाती जमाती सेलचे तालुकाध्यक्ष सचिन मदने यानी दिला आहे.तसे जत तहसीलदार सचिन पाटील यांना निवेदन दिले आहे.

        यावेळी प्रथमेश पवार, रोहित चव्हाण, संतोष कुळाल ,राजेश गनाचारी, प्रशांत वाघमोडे, रहेमान उमराणी ,अभिजित शेजूळ ,विजय शिंदे ,सौरभ पाटील आदी उपस्थितीत होते.
         मदने म्हणाले शासनाने दुष्काळ जाहीर करूनही कोणत्याही उपाययोजना जनतेला मिळत नाहीत.शासन घोषणा करुन जनतेची क्रूर चेष्टा करत आहे.हे शासन शेतकर्याच्या हिताचे नसून भांडवलदाराना जोपसण्याचे काम करीत असल्याची टिका केली.जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न ही गंभीर झालेला आहे .याकरिता राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी भटक्या विमुक्त जाती च्या वतीने व प्रदेशाध्यक्ष जयंत  पाटील, प्रकाश शेंडगे,सुरेश शिंदे, उत्तम चव्हाण ,टिंमू एडके यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळाच्या उपाययोजना  सुरू केल्या नाही तर येत्या १४ तारखेला जत तहसीलदार कार्यालय समोर आमरण उपोषण बसणार आहोत.

No comments:

Post a Comment