जत,(प्रतिनिधी)-
प्रत्येकाच्या
घरी किमान एकतरी गाय पाळावी, असा उपदेश आमृतानंद स्वामीजींनी
आवंढी (ता. जत) येथ
केला. त्यांनी आवंढी येथे गाभण गायीची पुजा केली. यावेळी बोलताना स्वामीजी म्हणाले, गायी ही इतर जनावरांपेक्षा
वेगळी असुन तिच्या पोटात तेहत्तीस कोटी देव आहेत असे का म्हंटले जाते तर गायीचे दुध,
तुप, इतर पदार्थ व गोमुत्र सुध्दा बहुगुणकारी आहेत
हे सिध्द् झाले आहे.
आवंढी येथील भाऊसो विठोबा कोडग व सखुबाई कोडग यांनी
एक गाय पाळलेली आहे. तीचे नाव गोपी असे ठेवलेले आहे,
मागील आठवड्यात गोपीचे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम कोडग कुटुंबियांनी अगदी
धुमधडाक्यात केला होता. त्या कार्यक्रमाचे फोटो व बातमी वॉटसअप
व फेसबुकवर पाहुन स्वामीजींनी कोडग यांच्या घरी येऊन गायीची पुजा केली व गायीसाठी पेंड
व गुळाच्या ढेपी प्रदान केल्या. तसेच कोडग कुटुंबाचे गायीचा चांगला
सांभाळ करुन तिचे डोहाळे पुरवण्याचा एक अगळावेगळा कार्यक्रम केल्याने कौतुक करुन त्यांचा
सत्कारही केला. चक्क एका गायीसाठी स्वामीजी बालगावच्या श्री गुरुदेव
आश्रमातुन कोडग यांच्या घरी आल्याने कोडग कुटुबियांबरोबरच ग्रामस्थही भारावुन गेले
होते, यावेळी स्वामीजींचे स्वागत डॉ.प्रदिप
कोडग यानी केले. आश्रम व स्वामीजींविषयी माहिती दिनराज वाघमारे
यांनी दिली. यावेळी धोंडिराम कोडग, वसंत
कोडग, सिंधुताई कोडग, आंबुताई कोडग व इतर
ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment