जत,(प्रतिनिधी)-
जनतेच्या व कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचे पण प्रलंबित प्रश्न महाराष्ट्र राज्य सरकारने सोडवावेत, या बद्दल शासनाकडे आग्रह धरण्यासाठी आशा गटप्रवर्तक, सरकारी आरोग्य कर्मचारी, मेडिकल ऑफिसर्स, नर्सेस संघटना व जन आरोग्य अभियान यांनी एकत्र येऊन “आरोग्य सेवा संरक्षण आणि हक्कासाठी आघाडी” स्थापन केली असून या आघाडीतर्फे दि. २३ जानेवारी २०१९ रोजी आझाद मैदान, मुंबई येथे विशाल धरणे आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सुमारे १५ हजार आशा गटप्रवर्तक महिला तसेच नर्सेस, फार्मासिस्ट, आरोग्य कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, अनेक सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनचे महासचिव एम.एच.शेख यांनी या प्रसंगी सांगितले कि, केंद्र व राज्य सरकार एकूणच आरोग्य क्षेत्राचे खाजगीकरण करत आहे व आरोग्य सेवा विमा कंपन्याच्या ताब्यात देऊन सरकार आपली जबाबदारी झटकत आहे. रिक्त जागा भरणे व कंत्राटीकरण थांबविणे हे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय निकडीचे झाले आहे.
महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक फेडरेशनचे महासचिव कॉ. सलीम पटेल यांनी “आशा” या शासकीय योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविण्याचे महत्वाचे काम करत असून त्यांना इतर राज्याप्रमाणे नियमित व निश्चित वेतन मिळावे, त्यांच्या कामाच्या मोबदल्यात चार पटीने वाढ करावी, प्रा.फंड, ग्रच्युटी, विमा योजना व इतर सामाजिक सुरक्षा लागू कराव्यात अशी मागणी केली.
औषधांचा प्रचंड तुटवडा संपवा! आरोग्याचे बजेट वाढवा, मोफत व पुरेसा औषध पुरवठा करा, सरकारी दवाखाने सुधारा व जनतेला चांगली आरोग्य सेवा द्या, दुष्काळी भागातील जनतेला युजर फी न घेता आरोग्य सेवा द्या, या व इतर मागण्यासाठी संघटनेच्या शिष्टमंडळाची आरोग्यमंत्री, संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान व अर्थमंत्री सुधीर मूनगुंटीवार यांच्या सकारात्मक चर्चा झाली. आरोग्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्यासहित संबधित सर्व विभागाशी पुढील आठवड्यात विस्तुत बैठक करून आशा गटप्रवर्तक यांच्या प्रलंबित मागण्यावर शासन निर्णय घेईल असे मंत्री महोदयांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या सर्व राज्यस्तरीय संघटना, त्यांचे नेतेमंडळी तसेच जनआरोग्य अभियानाचे डॉ. अभिजित मोरे, अभय शुक्ला, लोकसत्ताचे ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य, सिटूचे कोषाध्यक्ष के.आर.रघु, एम.ए.पाटील, शुभा शमीम, अलमायटी इराणी, फेडरेशनच्या अध्यक्षा आनंदी अवघडे, नेत्रादिपा पाटील आदींनी धरणे आंदोलनास मार्गदर्शन केले.
पुष्पा पाटील, विजयाराणी पाटील, अर्चना धुरी, प्रीती मेश्राम, राजेंद्र साठे, संध्या पाटील, मंगला ठोंबरे, उज्वला पडलवार, हणमंत कोळी, मीना कोळी, सुप्रिया सांगव, उज्वला पाटील, जयश्री मोरे, निकिता कदम, अंजू नदाफ,हेमा इमन्नावर,जनिता तांबे,कल्याणी मराठे, शरद पाटील, राजन गावंडे, शिवाजी कुरे, गोविंद अर्दंड, भाई देसकर इत्यादींनी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाचे योगदान दिले.
No comments:
Post a Comment