जत,(प्रतिनिधी)-
ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंडस सर्कल या
राष्ट्रीय पत्रकार मित्र संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी जत (जि. सांगली) येथील पत्रकार, लेखक मच्छिंद्र ऐनापुरे यांची नुकतीच
निवड करण्यात आली आहे. कोल्हापूर येथे रविवारी (दि.13 जानेवारी रोजी) झालेल्या
महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली.
पत्रकार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष यासीन
पटेल यांनी निवडीचे पत्र देऊन श्री. ऐनापुरे
यांचा सत्कार केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष सतीश कदम, माजी प्रदेशाध्यक्ष विकास कुलकर्णी, झुल्फिकार काझी,नितीन भगवान, गौतम लंके यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील
पदाधिकारी उपस्थित होते.
मच्छिंद्र ऐनापुरे हे गेल्या वीस वर्षांपासून
पत्रकार क्षेत्रात कार्यरत आहेत. दैनिक महासत्ता,
दैनिक लोकमतमध्ये सध्या कार्यरत असून जत न्यूजचे सल्लागार संपादक म्हणूनही
काम पाहात आहेत. याशिवाय लेखक म्हणूनही त्यांचा नावलौकिक असून
त्यांची चार पुस्तके प्रसिद्ध आहेत. मच्छिंद्र ऐनापुरे या नावाने
ते ब्लॉग लिहित असून या ब्लॉगवर त्यांचे सुमारे 1300 लेख प्रसिद्ध
आहेत. त्यांनी लिहिलेल्या कॅप्टन राधिका मेनन या धड्याचा समावेश
इयत्ता आठवीच्या बालभारती पुस्तकात करण्यात आला आहे. त्यांना
यापूर्वी साहित्यरत्न, समाजभूषण, उत्कृष्ट
पत्रलेखक, आदर्श पत्रकार, शिक्षक असे पुरस्कार
मिळाले आहेत.
श्री. ऐनापुरे हे ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंडस सर्कलचे संस्थापक सदस्य आहेत.
यापूर्वी त्यांनी प्रदेश सरचिटणीस पदाची धुराही यशस्वीपणे सांभाळली आहे.
या त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment