जत (प्रतिनिधी):
श्री रामराव विद्यामंदीर हायस्कूलचा विद्यार्थी किरण विजय नाईक याने उंदीर पकडण्याचे साधन हे उपकरण बनविले होते. त्यास जत तालुक्यातील वळसंग येथील तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात व्दितीय क्रमांक मिळाला होता. त्यानंतर त्याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. जिल्हास्तरीय स्पर्धेतही किरण नाईक याने उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले.
किरण नाईक हा दरवर्षी वेगवेगळे उपक्रम करीत होता. यापूर्वीही त्याने विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेतला होता. इयत्ता ६ वी ते ८ वी गटात त्याची निवड झाली आहे. Rat Catcher म्हणून उंदीर पकडण्याचे साधन हे यंत्र त्याने बनविले आहे. जिल्हापरिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्याहस्ते प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देउन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे शिक्षक कृष्णा संकपाळ हे उपस्थित होते. त्यास विज्ञान शिक्षक अजय बोडेकर, कदम सर, हायस्कूलचे मुख्याध्यापक व्ही. पी. बोराडे, उपमुख्याध्यापक सुनिल मोहिते, पर्यवेक्षिका एस.के.सावंत, विजय नाईक व सीमा नाईक यांचे मार्गदर्शन लाभले.
No comments:
Post a Comment