सांगली,कोल्हापूर, नाशिक,पुणे या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांसह मराठवाड्यातही
अॅपल बोर हे नगदी पीक चांगलेच रुजत आहे. अत्यंत कमी पाणी, कमी खर्च, कमी
देखभाल अशा अवस्थेतही हे फळपीक उत्तम प्रकारे येते. फळांचा आकार
मोठा आकर्षक रंग, चवीला छान असलेले अॅपल
बोर स्थानिकांसह शहरांमधल्या बाजारांमध्ये चांगला उठाव करत आहे. विशेष म्हणजे अॅपल बोराला मिळत असलेला प्रतिसाद हा तोंडातोंडी
आहे. कृषी विद्यापीठे किंवा कृषी विभाग यांच्या शिफारशींशिवाय
राज्यात अॅपल बोरला चांगले मार्केट मिळत आहे.
राज्यात सातत्याने दोन-तीन वर्षात दुष्काळ पडत आहे.
त्यामुळे कमी पाण्यावर येण्यार्या पिकांकडे शेतकरी
वळत आहे. अॅपल बोरचे वाढलेले क्षेत्र त्याचेच
द्योतक आहे. अॅपल बोरचा प्रवास हा बांगला
देशमधून पश्चिम बंगाल मार्गे जवळपास दहा एक वर्षांपूर्वी राज्यात
दाखल झाले. राज्यात रोपं उपलब्ध नसताना, शास्त्रशुद्ध लागवडीची कोणतीही माहिती हाताशी नसताना या फळपिकाखालील क्षेत्र
वाढत आहे. ग्रामीण आणि शहरी ग्राहकांच्या पसंदीस उतरलेल्या हे
बोर फळपीक फक्त माध्यमे आणि यापूर्वी लागवड केलेल्या शेतकर्यांकडून
मिळालेल्या माहितीच्या आधारे वाढले आहे. वास्तविक या फळपिकाविषयी
कृषी संशोधन संस्थांमध्ये आणखी अभ्यास आणि संशोधन व्हायला हवे. अधिकृत माहिती लोकांना मिळायला हवी. याचा फायदा शेतकर्यांनाच होणार आहे. सध्या काही खासगी व्यावसायिक बाहेरील
राज्यातून रोपं आनून त्याची विक्री करत आहेत. त्यामुळे शेतकर्यांना ही रोपे महाग पडत आहेत. शिवाय दर्जाबाबत काही निश्चित सांगता येत नाही. मागे काही वर्षांपूर्वी डाळिंबाच्या
काही जातीची रोपे शेतकर्यांनी राज्यात आणली. या माध्यमातूनच तेल्या रोगाचा प्रसार झाला. एडससारखा
असलेला रोग नष्ट करण्यासाठी शेतकर्यांना अख्ख्या बागाच्या बागा
उचकटून टाकाव्या आणि जाळून नष्ट कराव्या लागल्या. त्यामुळे राज्याच्या
कृषी संशोधन किंवा विभागाकडून याचे अधिक संशोधन करून शिफारस मिळायला हवी.
No comments:
Post a Comment