जत,(प्रतिनिधी)-
जत येथील सेवानिवृत्त शिक्षक मच्छिंद्र मारुती उबाळे ( वय ७८ रा.दुधाळ वस्ती जत ) यांचे रविवारी दुपारी अल्पशा आजाराने रहात्या घरी निधन झाले . सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पाश्चात्य पत्नी , चार मुले व सुना , नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी सकाळी आठ वाजता करण्यात येणार आहे.
मूळचे वाळेखिंडी येथील असलेले उबाळे जत तालुक्यातील शेगाव, कुंभरी, शिंगणहळळी,उंटवाडी अशा अनेक ठिकाणच्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक म्हणून काम केले. उंटवाडी येथून मुख्याध्यापक पदावर असताना ते निवृत्त झाले. उबाळे गुरुजी लेखक म्हणूनही प्रसिद्ध होते. त्यांच्या काही कथांचे वाचन आकाशवाणी सांगली केंद्रावरून झाले आहे.
No comments:
Post a Comment