Sunday, January 13, 2019

आमदार, खासदारांच्या प्रयत्नामुळे जत शहरासाठी दोन कोटींचा निधी


विजय ताड यांची माहीती
जत,(प्रतिनिधी)-
 आमदार विलासराव जगताप व खासदार संजय पाटील यांच्या प्रयत्नामुळे नगरपरिषदांना सहाय्य योजनेअंतर्गत दोन कोटी रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दिल्याची माहिती जत नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते विजय ताङ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी नगरसेवक उमेश सावंत, प्रकाश माने, प्रमोद हिवरे, दीप्ती सावंत, संतोष मोटे, अजिंक्य सावंत, किरण शिंदे, अण्णा भिसे आदी उपस्थित होते.आमदार व खासदारांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक तीनमध्ये गटार, रस्ता डांबरीकरण, प्रभाग क्रमांक चार काँक्रिटीकरण, प्रभाग क्रमांक 9 काँक्रिटीकरण, प्रभाग क्रमांक 6 सीडी वर्क बांधणे, प्रभाग क्रमांक 8 रस्ता डांबरीकरण व गटार बांधणे, प्रभाग क्रमांक 9 गटार व रस्ता काँक्रिटीकरण असा दोन कोटी रुपयांचा निधी दिला आहे. नगर परिषदेच्या माध्यमातून ही कामे व्यवस्थित होत नाहीत व निकृष्ट दर्जाची कामे होत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ही कामे वर्ग झाली आहेत. त्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने जत शहरातील ही कामे होतील, असे त्यांनी सांगितले.
आमदार सुधीर गाडगीळ यांनी मंत्रालयातून वेगळा निधी आणून सांगली शहरातील रस्ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, त्याच पद्धतीने आमदार विलासराव जगताप यांच्या माध्यमातून जत शहरातील रस्त्यासाठी गटारीसाठी वेगवेगळ्या विकासासाठी मोठा निधी असून संपूर्ण शहराचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी यापुढे आम्ही प्रयत्न करणार असल्याचे सांगून जत शहरात पुन्हा एकदा आमदार पॅटर्न राबविणार असल्याची माहिती श्री. ताड यांनी दिली.

No comments:

Post a Comment