जत,(प्रतिनिधी)-
कोल्हापूर येथे झालेल्या आठव्या राज्यस्तरीय 'पेंचक सिलाट' या इंडोनेशियन मार्शल आर्ट्स स्पर्धेत मिरजेच्या सुभाषनगर येथील शिवलीया कला, क्रीडा, संकुलच्या खेळाडूंनी एक सुवर्ण, एक रौप्य व तीन कास्य पदके मिळवून 28 ते 30 जानेवारी रोजी औरंगाबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपला प्रवेश निश्चित केला आहे. त्यांचे अभिनंदन होत आहे.
पदक विजेते खेळाडू पुढीप्रमाणे: दहा ते बारा वर्षे वयोगट आणि 42 ते 44 वजनगटात आयुष सुधाकर बंडगर याने सुवर्णपदक पटकावले आहे. तसेच 30 ते 36 किलो वजन गटात वेदांत वैभव पाटील यांनी कास्य पदक मिळवले तर 30 किलोखालील वजन गटात वैभव विजय पवार यांनी कास्य पदक मिळवले. दहा वर्ष खालील वयोगटात विराज वैभव पाटील यांनी कास्य पदक मिळवले.तसेच 14 ते 17 वर्षे वयोगटातली मुलींमध्ये 49 ते 52 किलो वजन गटात सोनाली सुदर्शन जाधव यांनी रौप्यपदक मिळवले. या सर्व खेळाडूंना संस्थाध्यक्षा सौ, रुक्साना बाबू मागदुम, सॅम्युअल फर्नांडिस, पैलवान अविनाश भगत, अमोल कबाडे, सांगली शहर अध्यक्ष हमजेखान खान मुजावर यांचे प्रोत्साहन लाभले.तसेच राष्ट्रीय कराटे प्रशिक्षक आप्पासाहेब तांबे, किरण कचरे यांचे मार्गदर्शन लाभले.
No comments:
Post a Comment