जत,(प्रतिनिधी)-
शासनाने दुष्काळाच्या सोयी व सवलती जाहीर केल्या आहेत
.परंतु त्याची अमंलबजावणी अद्याप सुरू करण्यात आली नाही .बंद असलेली अंमलबजावणी
त्वरित सुरू करण्यात यावी या मागणीसह इतर विविध मागण्यासाठी जत तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जत तहसीलदार कार्यालयासमोर
आज ठिय्या आंदोलन करण्यात आले .
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की
शासनाने विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करण्यात येत आहे अशी घोषणा केली आहे.
परंतु विद्यार्थ्याकडून शिक्षण संस्थेत सक्तीने फी भरून घेतली जात आहे . भरून
घेतलेली फी विद्यार्थ्यांच्या खात्यावर त्वरित परत वर्ग करण्यात यावी. पाणीटंचाई
जाणवत असलेल्या गावातील नागरिकांनी टँकरची मागणी
केल्यानंतर प्रशासनाकडून टँकर मंजूर
करण्यास विलंब केला जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना तीव्र
पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
टॅकरद्वारे प्रति माणसी वीस लिटर याप्रमाणे
पाणी पुरवठा केला जात आहे .सदरचे पाणी अपुरे पडत असून
मानसी ७० लिटर याप्रमाणे पाणी पुरवठा करण्यात यावा व जनावरांसाठी पाण्याची वेगळी
व्यवस्था करण्यात यावी .जत तालुक्यातून जाणाऱ्या राज्य मार्गाचे काम संथ गतीने
सुरू आहे त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे
.त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे . संथ गतीने सुरू असलेले काम गतीने
पूर्ण करण्यात यावे .प्रांताधिकारी , तहसीलदार व पंचायत समिती कार्यालय परिसरात खाजगी एजंटाचा वावर मोठ्या प्रमाणात
सुरू आहे . ग्रामीण भागातून प्रशासकीय कामासाठी आलेल्या नागरीकांची त्यांच्याकडून आर्थिक पिळवणूक होत आहे.प्रशासनाने या
एजंटांचा बंदोबस्त करावा इत्यादी मागण्या या निवेदनात करण्यात आली आहेत .
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तम चव्हाण , उपनगराध्यक्ष
आप्पासाहेब पवार , नगरसेवक लक्ष्मण एडके , अँड बि.ए.धोडमणी ,रमेश पाटील , सुरेश शिंदे , पंचायत समिती माजी उपसभापती शिवाजी
शिंदे व हेमंत खाडे , सचिन मदने ,
रमेश पाटील, हेमलता कदम, योगेश कोळी ,सुनील पाटील , अशोक
कोळी , मंजुनाथ गायकवाड ,इलाई नदाफ
आदीजण उपस्थित होते.तहसीलदार सचिन पाटील यानी निवेदन स्विकारुन उपाययोजना करण्याचे
अश्वासन दिल्यानंतर आंदोलन पाठीमागे घेण्यात आले.
No comments:
Post a Comment