Saturday, January 19, 2019

नवीन वर्षाचा पहिला ‘सुपरमून’ २१ रोजी

जत,(प्रतिनिधी)-
चंद्र पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार मार्गाने फिरत असतो. त्यामुळे तो महिन्यातून एकदा पृथ्वीच्या जवळ येतो व एकदा दर ही जातो. मात्र, ज्यावेळी चंद्र पृथ्वीपासून वाजवीपेक्षा कमी अंतरावर येतो. त्यावेळेस चंद्राचे बिंब नेहमीच्या पौर्णिमेच्या चंद्रापेक्षा मोठे दिसते. अशा चंद्राला ‘सुपरमून’ असे म्हगतात. दि. 21 जानेवारी रोजी या वर्षीची पहिल्या सुपरमूनचा योग आहे.
8
साधरणतः 12 महिन्याच्या कालचक्रात चार ते सहा सुपरमूनचे योग येतात. मागील वर्षी 2 जानेवारीला हा योग आला होता, तर आता 21 जानेवारी, 19 फेब्रुवारी व 21 मार्च रोजी पुन्हा सुपरमूनचे योग आहेत, या तीनही सूपरमूनमध्ये 19 फेब्रुवारीचा सूपरमून सगळ्यात मोठा राहिल. याच दिवशी जागतिक वेळेनुसार पहाटे 5 वाजून 17 मिनिटांनी चंद्र, पृथ्वीपासून किमान अंतरावर येईल. यावेळी हे अंतर 3,53,344 कि.मी. राहील. या बिंदूवर चंद्र जवळ जवळ 22 मिनिटे पर्यंत राहील व तो नेहमीच्या चंद्रापेक्षा 30 टक्के अधिक तेजस्वी व आकारमानात 14 टक्के मोठा दिसेल.
चंद्राच्या आकर्षणाने समुद्राच्या पाण्याला भरती-ओहोटी येते. दि. 21 जानेवारीला चंद्र पृथ्वीपासून न्यूनतम अंतरावर येणार असल्यामुळे यावेळेस नेहमीपेक्षा जास्त उंचीच्या लाटा निर्माण होण्याची शक्यता राहील, चंद्र पृथ्वीपासून जवळ असतानाचा आकार व दूर असतानाचा आकार यात सूक्ष्म फरक असतो, त्यामुळे चंद्राच्या आकारात होणारे बदल सहज लक्षात येत नाहीत. मात्र, शास्त्रज्ञ विशेष फाटोग्राफीच्या माध्यमातून चंद्राच्या आकारातील बदल लक्षात येऊ शकतात.

No comments:

Post a Comment