Wednesday, January 23, 2019

म्हैसाळ योजनेच्या कामासाठी शनिवारी बैठक

 जत,(प्रतिनिधी)-
म्हैसाळ योजनेच्या कामाला गती देऊन, म्हैसाळ योजने अंतर्गत बंदिस्त व नैसर्गिकरित्या (सायपन) पध्दतीने जत पूर्वभागातील दोड्डानाला व संख मध्यम प्रकल्पासह तालुक्यातील 16 लघुपाटबंधारे तलाव व आसपासचे पाझर तलाव भरून देण्यासंदर्भात 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित तालुका पाणी संघर्ष समितीच्यावतीने आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बैठक आयोजित केल्याची माहिती तालुका पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पोतदार यांनी पत्रकारांच्या बैठकीत दिली.

पोतदार म्हणाले, गेल्या तीन पिढ्या मैसाळ सिंचन योजनेच्या पाण्याची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत, केवळ निवडणुका आल्या की प्रत्येकजन म्हैसाळ योजना, तुबची बबलेश्वर, हिरेपडसलगी योजनांचा प्रचार करत स्वतःची निवडणुकीत पोळी भाजून घेताना दिसतात. त्यामुळे अशा लोकांना धडा शिकविण्यासाठी, तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीने उमदी ते सांगली पदयात्रा काढली. या आंदोलनानंतर 32 कोटी म्हैसाळ योजनेला मिळवून दिले, या योजनेचे पाण्यासाठी पाठपुरावाही केला. त्यामुळे पाणी येईपर्यंत उपोषण करण्याचा निर्धार 26 जानेवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवू, अशी माहिती पोतदार यांनी दिली.

No comments:

Post a Comment