Wednesday, January 30, 2019

डफळापूर मुलींच्या शाळेची क्षेत्रभेट

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील डफळापूर येथील जि.प. मुलींच्या शाळेमध्ये शिक्षण पूरक उपक्रम या सदराखाली क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले  होते. डफळापूर गावाच्या पश्चिमेला असणारे म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या  कॅनॉलमधून पाण्याचा पाठ मागील दहा दिवसापासून वाहत आहे. सध्या जत तालुक्यात मोठा दुष्काळ आहे. आजूबाजूला पाणी नसल्याने लोकांचे हाल सुरू आहेत. शेतीचा प्रश्न गंभीर झाला आहे,अशा परिस्थितीत म्हैसाळ योजनेचे पाणी डफळापूर परिसरात आल्याने आनंदाचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांना कॅनॉल व त्यातील वाहात असलेला पाण्याचा  पाठ ही  काय संकल्पना असते हे समजावून देण्यासाठी येथील शाळेचे शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य यांच्या संकल्पनेतून क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते.

पाणी कुठून आले आहे, त्याचा प्रवाह कसा असतो  हे सर्व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष स्थळावर नेऊन दाखवण्यात आले व समजावून सांगण्यात आले. तसेच तेथील पोपट पुकळे यांचे पुकळे उदयोग समूह चे वृन्दावन ऍग्रो इंडस्ट्रीज (डफळापूर) यांचे डाळी निर्मिती व पशु खाद्य, मका चुणी तयार करण्याची प्रक्रिया व कारखाना दाखवण्यात आला. यावेळी कारखान्याची माहिती श्रीनिवास व अनिरुद्ध पुकळे यांनी दिली. त्यांच्याच शेतामध्ये असणारे फणसाचे झाड फक्त कोकणातच पाहिला मिळते. ते सुद्धा विद्यार्थ्यांना क्षेत्रभेटीमध्ये दाखवण्यात आले. 'लेक शिकवा, लेक वाचवा' अंतर्गत शेतकऱ्यांची मुलाखत घेतली. केंद्राचे केंद्रप्रमुख शंकर बेले व शाळेचे मुख्याध्यापक रेखा कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर क्षेत्रभेटी चे आयोजन केले. क्षेत्रभेटीचे नियोजन व कार्यवाही अजंता लोंढे, शंकर कुंभार, आरती कांबळे,उद्योगरत्न संकपाळ,जयश्री मगदूम, मनीषा शिंत्रे यांनी केले.

No comments:

Post a Comment