जत,(प्रतिनिधी)-
घरासमोरील गटारीत सतत कचरा साचून दुर्गंधी पसरते त्यावर जाळी बसवा म्हणून सांगितल्याचा राग मनात धरुन सलीम महमंद काकतीकर ( वय ५० रा.हुजरे गल्ली जत ) यांच्या हातावर चाकूने हल्ला करून जखमी केल्याच्या आरोपावरून उत्तम थोरात व त्यांची बहीण सुनिता गडदे रा.दोघे जत यांच्या विरोधात जत पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना आज दुपारी घडली आहे. याप्रकरणी अद्याप कोणासही अटक करण्यात आली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की , हुजरे गल्ली येथे सलीम काकतीकर व उत्तम थोरात यांची समोरासमोर घरे आहेत. थोरात यांच्या घरासमोरील गटारीत कचरा साचून सतत दुर्गंधी पसरते म्हणून सलीम यांनी गटारीला जाळी बसवून घ्या असे उत्तम यांना आज सकाळी सांगितले होते .याचा राग मनात धरून उत्तम व त्यांची बहिन सुनीता गडदे या दोघानी सलीम यांच्या हातावर चाकू हल्ला करून व काठीने मारहाण करून त्यांना जखमी केले आहे.याप्रकरणी सलीम यांनी वरील दोघांच्या विरोधात जत पोलीसात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस हावलदार विजय विर करत आहेत.
No comments:
Post a Comment