सोशल मिडिया आज अनेकांचा अविभाज्य भाग
झाला आहे. जगभरात दिवसातील बराच वेळ अनेकजण फेसबुक, ट्विटर यासारख्या सोशल मीडियावर घालवत असतात. सोशल मीडियाचा
वापर करणार्या मुलींना डिप्रेशन म्हणजेच नैराश्याचा धोका अधिक
असतो, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. मुलांपेक्षा मुलींमध्ये सोशल मीडियाचा अतिवापर नैराश्यासाठी कारणीभूत ठरू शकतो.
लंडन कॉलेज विद्यापीठाने केलेल्या अभ्यासातून हा दावा करण्यात आला आहे.
संशोधकांनी 14 वर्ष वयोगटातील 11 हजार मुलींचा अभ्यास केला यामध्ये दिवसातल्या पाच तासांपेक्षा जास्त वेळ सोशल
मीडियावर घालवणार्या 40 टक्के मुलींमध्ये
नैराश्याची लक्षणे दिसून आली.
मुलांमध्ये हे प्रमाण
15 टक्क्यांपेक्षाही कमी आहे. सोशल मीडियाचा वापर
न करणार्या मुलींचे प्रमाण केवळ चार टक्के, तर मुलांचे 10 टक्के असल्याचे ही या अभ्यासातून समोर
आले आहे. सोशल मीडियाचा कमी वापर करणार्या 12 टक्के मुलांमध्ये तसेच या माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर
वापर करणार्या 38 टक्के व्यक्तींमध्ये
अधिक तीव्र नैराश्याची लक्षणे आढळल्याचे या अभ्यासात नमूद केले आहे. सोशल मीडिया आणि नैराश्यातील संबंधाचा कार्यकारणभाव समजून घेण्याचा प्रयत्न
संशोधकांनी केला, तेव्हा इंटरनेटवरून छळणूक (ऑनलाइन हॅरॅसमेंट, सायबर बुलिंग) झाल्याचे प्रकार 40 टक्के मुली आणि 25 टक्के मुलांनी अनुभवल्याचे स्पष्ट झाले आहे.

No comments:
Post a Comment