जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील उंटवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेची कु. पूजा दुडाप्पा हुचगोंड हिने जिल्हा स्तरीय लांब उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.
जत तालुक्यातील उंटवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेची कु. पूजा दुडाप्पा हुचगोंड हिने जिल्हा स्तरीय लांब उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.
2018-19 सालातील जिल्हास्तर क्रीडा स्पर्धा नुकत्याच सांगलीत पार पडल्या. यावेळी जिल्हास्तरीय लांब उडी स्पर्धादेखील झाल्या. यात कु.पूजा दुडाप्पा हुचगोंड हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. तालुकास्तरीय स्पर्धेतही तिने प्रथम क्रमांक पटकावला होता. या विद्यार्थीनीला शिक्षक विठ्ठल जाधव, प्रभू खूपसे, अंकुश कांबळे, माधव टार्फे, ज्योती फोपसे, गणपत खोकले यांचे मार्गदर्शन लाभले.
मुख्याध्यापक प्रभू खुपसे, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बी. एस. खोत यांचेही सहकार्य लाभले. गटशिक्षणाधिकारी बी. एन.जगधने, आर. डी.शिंदे, तानाजी गवारी, खोजनवाडी केंद्रप्रमुख श्री.हिरेमठ आदींनी तिचे अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment