Wednesday, January 23, 2019

आसंगी तुर्कचा कबड्डी संघ जिल्ह्यात प्रथम

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील आसंगी तुर्क येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या मोठ्या गटातील मुलींच्या कबड्डी संघाने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

नुकत्याच सांगली येथे  जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या. या  जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धेत  आसंगी तुर्कच्या  जि.प.प्राथमिक मराठी शाळेच्या मुलींच्या संघाने  प्रथम क्रमांक मिळविला. या संघाला मुख्याध्यापक  मनोज खोकले, संतोष राठोड, सुनील साळवे, सुधाकर संग्रामे, नामदेव जानकर, विलास मेंडके, विलास चिकुर्डेकर यांचे मार्गदर्शन लाभले. या  सर्व खेळाडूंचे गटशिक्षणाधिकारी बी. एन.जगधने,विस्तार अधिकारी आर. डी.शिंदे, तानाजी गवारी,श्री.राठोड, केंद्रप्रमुख, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी व सदस्य यांनी अभिनंदन केले आहे
जत नं १ च्या पटांगणावर झालेल्या तालुकास्तरीय कबड्डी सामन्यात या संघाने प्रथम क्रमांक पटकावला होता.

No comments:

Post a Comment