सांगली,(प्रतिनिधी)-
आदिवासी
धनगर साहित्य संमेलन दि. 18, 19 आणि 20 जानेवारी रोजी म्हसवड या ठिकाणी आयोजित करण्यात आले असून या साहित्य संमेलनात
शोभायात्रा, चर्चासत्रे, कविसंम ेलन,
समाजाच्या विकासासाठी काम करणार्या मान्यवरांना
सन्मान आदी कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती संमेलनाचे संस्थापक
अध्यक्ष डॉ. अभिमन्यू टकले यांनी दिली.
सातारा
जिल्ह्यातील माण तालुक्यातील म्हसवड या ठिकाणी सुभेदार मल्हारराव होळकर साहित्य नगरीत
हे साहित्य संमेलन होणार आहे. शुक्रवार दि. 18 रोजी या संमेलनाची सुरुवात ध्वजपूजन आणि ग्रंथदिंडीने होणार आहे. खासदार उदयनराजे भोसले, सहकारमंत्री सुभाष देशमुख,
यांच्याहस्ते होणार आहे. 19 रोजी या संमेलनाचे
उद्घाटन माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याहस्ते होणार आहे. यावेळी संमेलनध्यक्ष म्हणून प्रसिध्द साहित्यिक संत वाङ्मयाचे अभ्यासक डॉ.
मुरहरी केळे आहेत. यावेळी विधानपरिषदेचे सभापती
रामराजे नाईक-निंबाळकर, जलसंधारणमंत्री
राम शिंदे, महादेव जानकर, सामाजिक न्यायमंत्री
राजकुमार बडोले, पालकमंत्री विजय शिवतारे, शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील, सांगलीच्या
महापौर संगीता खोत आदी उपस्थित राहणार आहेत.
समारोप
20 रोजी खासदार सुप्रिया सुळे, माजी खासदार रणजितसिंह
मोहिते-पाटील, प्रकाश आंबेडकर, खासदार राजू शेट्टी, जिल्हा परिषद सातारचे अध्यक्ष संभाजीराजे
नाईक- निंबाळकर आदी उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात समाजात विविध क्षेत्रात कार्य करणारे सांगलीचे नगरसेवक विष्णू
माने, सोलापूरचे कवी गोविंद काळे, गोंदियाचे
प्राचार्य प्रभाकर लोंढे, अहिल्यादेवी होळकर शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष
रामचंद्र चोपडे, पांडूरंग रुपनर, अरुण गावडे
आदींचा सन्मान करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment