Thursday, January 24, 2019

सदाशिव पाटील यांच्या 'सुलभ हिंदी व्याकरण' पुस्तकाचे प्रकाशन


 
(सदाशिव पाटील यांच्या सुलभ हिंदी व्याकरण या पुस्तकाचे प्रकाशन डॉ.संजीवकुमार भूशेट्टीवाय देवेंद्रप्पाएम.एस.हिरेमठशंभू ममदापूर यांच्या उपस्थितीत झाले.)
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील जिरग्याळ येथील शिक्षक सदाशिव पाटील यांच्या सुलभ हिंदी व्याकरण या पुस्तकाचे प्रकाशन अथणी (जि. बेळगाव) येथील श्रीमती सी.बी.रनमोडे विद्यालयात एका कार्यक्रमात करण्यात आले. अध्यक्षस्थानी शंभू ममदापूर होते.
अथणी येथील के.एल.. या संस्थेच्या श्रीमती सी.बी.रनमोडे विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात सुलभ हिंदी व्याकरण या पुस्तकाचे प्रकाशन कर्नाटक विज्ञान परिषद (धारवाड)चे अध्यक्ष डॉ. संजीवकुमार भूशेट्टी, वाय.देवेंद्रप्पा, प्राचार्य एम.एस.हिरेमठ यांच्याहस्ते झाले. यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक,पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

श्री.पाटील महाराष्ट्रातील रहिवाशी असले तरी ते कर्नाटकातील अथणी येथील रनमोडे विद्यालयात अध्यापनाचे काम करतात. दोन्ही प्रांत हा कर्नाटक-महाराष्ट्राचा सीमाभाग आहे. या परिसरातील विद्यार्थ्यांना सहजसुलभ हिंदी अवगत व्हावी,यासाठी श्री.पाटील यांनी सुलभ हिंदी व्याकरण पुस्तकाची निर्मिती केली आहे. याचा नक्कीच लाभ विद्यार्थ्यांना होईल, असा आशावाद डॉ. संजीवकुमार भूशेट्टी यांनी पुस्तक समारंभप्रसंगी बोलताना व्यक्त केला. या पुस्तकासाठी जतचे लेखक मच्छिंद्र ऐनापुरे, प्राचार्य श्री.हिरेमठ यांचे सहकार्य लाभले. या पुस्तकाचे प्रकाशन सांगलीच्या प्रतिष्ठा प्रमोटर्स यांच्याकडून करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment