सांगली,(प्रतिनिधी)-
प्रदूषणाची सर्वोच्च पातळी गाठूनही त्यावर उपाययोजना करण्यात अपयशी ठरलेल्या
देशभरातील 102 शहरांना केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने तातडीने
‘अॅक्शन प्लॅन’ देण्याची
सूचना दिली आहे. महाराष्ट्रातील मुंबई, नवी मुंबई, बदलापूर, उल्हासनगर,
पुणे, नाशिक, सोलापूर,
कोल्हापूर, नागपूर अशा 17 शहरांची हवा नागरिकांसाठी घातक ठरत आहे. आश्चर्य म्हणजे यामध्ये 43 स्मार्ट सिटींचा समावेश आहे.
घातक हवा असलेल्या देशभरातील 102 शहरांची यादी केंद्राने चार महिन्यांपूर्वी जाहीर केली होती. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने ‘राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रम’ सुरु केला. त्यावेळी, या 102 शहरांतील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी स्थानिक प्रशासनांनी तातडीने कृती योजना आराखड पुणे, बदलापूर आणि उल्हासनगर या शहरातील नायट्रोजन डायऑक्साईडचे प्रमाण सर्वाधिक (घातक पातळी) असल्याचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांगितले. तर विदर्भातील नागपूर, अकोला, अमरावती आणि चंद्रपूर ही सर्वात प्रदूषित शहरे आहेत.
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात प्रदूषित शहरांची यादी सादर करुनही त्याची गांभीर्याने दखल न घेतली गेल्याबद्दल सरकारने ा नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई, पुणे, औरंगाबाद, अमरावती, जालना, कोल्हापूर आणि लातूर या शहरांनी अॅक्शन प्लॅन दिले होते, मात्र ते फेटाळल्यानंतर त्यांचे पुनरसादरीकरण केले गेले नाही. केंद्राने निश्चित केलेल्या मानकानुसार, ‘पार्टिक्युलेट मॅटर 10’चे वार्षिक सरासरी प्रमाण 60 आणि नायट्रोजन डायऑक्साईडचे वार्षिक सरासरी प्रमाण 40 पेक्षा अधिक असल्यास त्या शहरांना प्रदूषित शहर म्हटले जाते.
महाराष्ट्रातील प्रदुषित शहरे: सांगली, कोल्हापूर, सोलापूर, जालना, नागपूर,
अमरावती, अकोला, चंद्रपूर,
लातूर, मुंबई, नवी मुंबई,
बदलापूर, उल्हासनगर, पुणे,
नाशिक, जळगाव, औरंगाबाद
No comments:
Post a Comment