Saturday, January 12, 2019

विठुरायाच्या ऑनलाइन दर्शनाला शुल्क आकारणार


पंढरपूर,(प्रतिनिधी)-
 विठुरायाच्या ऑनलाइन दर्शनाला 100 रुपये शुल्क आकारण्याचा प्रस्ताव असून याबाबत शनिवारी झालेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आल्याची माहिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
या प्रस्तावाचे भाविकांकडून या स्वागत होत आहे. देशभरातून येणारे बहुतांश उच्य व मध्यमवर्गीय भाविक विठुरायाच्या दर्शनाला येण्यापूर्वी ऑनलाइनमध्ये बुकिंग करुन पंढरपूरमध्ये येत असतात. त्यामुळे अशा भाविकांना फुकट झटपट दर्शनाचा लाभ मिळतो. वर्षभरातील काही गर्दीचे दिवस वगळता 330 दिवस रोज सरासरी दोन हजार भाविक हे ऑनलाइन दर्शन घेत असतात. मंदिर समितीच्या आजच्या बैठकीत यावर विचार करण्यात आला. ऑनलाइन दर्शनासाठी 100 रुपये आकारावे, असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

दरम्यान या बैठकीस समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले हे उपस्थित नव्हते. सर्व सदस्य व अध्यक्ष याबाबत लवकरच निर्णय घेतील, असे औसेकर यांनी सांगितले. मागील वर्षी 13 लाख भाविकांनी ऑनलाईन दर्शन घेतले आहे. जर हा शुल्क आकारण्याचा प्रस्ताव मंजूर झाला तर समितीला किमान 14 कोटी रूपये उत्पन्न मिळू शकेल. यातून भाविकांना आणखी चांगल्या सुविधा देता येणे शक्य होईल. उत्पन्नात वर्षाला 8 ते 10 कोटी रुपयांची वाढ होणार आहे.

No comments:

Post a Comment