लव्ह मॅरेज म्हणजे, पुष्कळ दिवस प्रेम आणि एक दिवस लग्न
अरेंज्ड मॅरेज म्हणजे,
एक दिवस लग्न आणि पुष्कळ दिवस प्रेम !
लव्ह मॅरेज म्हणजे, लग्नाआधी हातात हात घालून फिरायचे;
अरेंज्ड मॅरेज म्हणजे,
निसटत्या स्पर्शासाठी झुरायचे!
लव्ह मॅरेज म्हणजे, रोज हॉटेलात एकमेकांची संगत
अरेंज्ड मॅरेज म्हणजे,
सार्यांसवे व्याही भोजनाची पंगत !
लव्ह मॅरेज
म्हणजे, जणू सारा तरुणाईचा खेळ
अरेंज्ड मॅरेज म्हणजे,
थोरामोठ्यांनी घडवून आणलेला मेळ !
लव्ह मॅरेज
म्हणजे, रोज घ्यायच्या नव्या आणा भाका
अरेंज्ड मॅरेज म्हणजे, उगा नाही मारायच्या थापा
!
लव्ह मॅरेज
म्हणजे, ’तुझे तूच वाढून घे ताट’
अरेंज्ड मॅरेज म्हणजे,
’यांची बघते जेवायला वाट.’
लव्ह मॅरेज म्हणजे, कल्पनेतली कविता असते छान
अरेंज्ड मॅरेज म्हणजे, नेहमीच वास्तवाचे असते भान!
प्रेम
असेल जर क्षणिक तर लव्ह मॅरेजही तुटतातच
सांभाळून घेतले एकमेकांस तर अरेंज्ड मॅरेजही टिकतातच !
*****
पाणी आयुष्यभर झाडाला मोठे करते. म्हणूनच, पाणी लाकडाला कधीच बुडू देत नाही! अगदी आपल्या आई-वडीलांसारखे..!!
*****
’आकाश’ आणि ’आभाळ’ एकदा प्रवीण दवणे यांनी शांताबाई शेळके यांना विचारले,
की तुम्ही तुमच्या एका कवितेत ’आकाश’ आणि ’आभाळ’ असे दोन शब्द वापरले
आहेत. दोन्हींचाही अर्थ तसा एकच आहे. मग
असे दोन वेगळे शब्द का? शांताबाईंनी सुंदर उत्तर दिले.
त्या म्हणाल्या, ’चुकतोय तू प्रवीण, जे निरभ्र असते ते आकाश आणि जे भरून येते ते आभाळ!’
*****
रवी एका कंपनीत मुलाखतीसाठी जातो.
बॉस : ’जावा’चे चार व्हर्जन सांगा.
रवी : मर जावा,
मिट जावा, लुट जावा, सदके
जावा.
मॅनेजर
: खूप छान! तुम्ही आता थेट घरी जावा.

No comments:
Post a Comment