जत,(प्रतिनिधी)-
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण
शुल्क शिष्यवृत्ती, डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना, राज्य
सरकारची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती अशा राज्य सरकारच्या 14 शिष्यवृत्तींसाठी
विद्यार्थ्यांना आता एकाच संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. राज्य सरकारने पुन्हा महाडीबीटी हे संकेतस्थळ नव्याने कार्यान्वित केले आहे.
विद्यार्थ्यांना
आता 2018-19 या शैक्षणिक वर्षामध्ये उच्च शिक्षण संचालनालयांतर्गत
सर्व शिष्यवृत्ती योजनांसाठी <https://mahadbtmahait.gov.in> या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
गेल्यावर्षी
सरकारने महाडीबीटी पोर्टलद्वारे सर्व शिष्यवृत्ती योजनांसाठीचे अर्ज ऑनलाइन स्वीकारले
जातील, असे जाहीर केले होते.मात्र पोर्टलमधील
त्रुटीमुळे अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरता आले नाहीत. त्यानंतर डीबीटी पोर्टलाऐवजी सरकारने महाईस्कॉल द्वारे शिष्यवृत्ती अर्ज करण्याचा
पर्याय उपलब्ध करून दिला. मात्र महाईस्कॉलसमवेत असलेला करार संपल्यामुळे
अनेक विद्यार्थ्यांना ऑफलाइन अर्ज करावा लागला होता.परंतु आता
सरकारने पुन्हा एकदा नव्याने महाडीबीटी संकेतस्थळ कार्यान्वित केले आहे.
ॠर्व महाविद्यालयांच्या
प्राचार्यांनी महाडीबीटी संकेतस्थळावर शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासंदर्भातील माहिती संस्थेच्या
आवारात दर्शनी भागात लावावी तसेच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी
सहकार्य करावे, अशा सूचना महाविद्यालयांना करण्यात आल्या आहेत.
तसेच शिष्यवृत्तीची रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार सलग्न बँक
खात्यात जमा झाल्याची माहिती या संकेतस्थळाद्वारे महाविद्यालयांना दिली जाणार आहे.
काही दिवसांपूर्वी नव्याने सुरू झालेल्या या संकेतस्थळाद्वारे आतापर्यंत
35 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. सरकारच्या
शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना 15 नोव्हेंबरपर्यंत
ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
गेल्यावर्षी
शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज केला होता. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची
पडताळणी करता अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. ऑनलाइन अर्ज
केल्यानंतर तो अर्ज ग्राह्य धरणार नाही,तुम्ही ऑफलाइन अर्ज करा,
असे सांगण्यात आले. त्यामुळे ऑफलाइन अर्जासाठी
खटाटोप करावा लागला. आता महाडीबीटी संकेतस्थळ नव्याने कार्यान्वित
झाले असले तरीही आम्हाला पुन्हा त्याच त्रासाला सामोरे जावे लागू नये, असे वाटते.-अनिकेत ऐनापुरे,डीकेटीई
कॉलेज,इचलकरंजी

No comments:
Post a Comment