जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील
कोंतेवबोबलाद येथे व्यापार्यांना खंडणी मागण्याच्या कारणावरून
जोरदार वाद पेटला आहे खंडणीबहाद्दरांना अटक करण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरले असून
खंडणी बहादारांना अटक करावी, तोपर्यंत बंद माघार घेत नसल्याचे
घोषित केले. कोंतेव बोबलाद ग्रामस्थांनी मागील दोन दिवसांपासून
गाव बंद ठेवले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर काँग्रेसचे
नेते विक्रमसिंह सावंत, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अप्पाराय बिराजदार,
माजी सभापती बाबासाहेब कोडग यांनी भेट दिली.
यावेळी बोलताना काँग्रेस पक्षाचे नेते विक्रम सावंत
म्हणाले,
ग्रामस्थांनी एकीचे बळ हाती घेऊन आंदोलन माघार नाही, पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी करत प्रशासनावर
नाराजी व्यक्त केली. सरपंच कुंडलिक बसाप्पा कांबळे बोलताना म्हणले
की, निवडणुकीचे राग मनात धरून विरोधक त्रास करत आहेत.
खंडणी मागून गावात दहशत पसरवणे हे योग्य नाही. व्यापारी वर्गात यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. अनेक
व्यापारी, डॉक्टर दहशतीमुळे व्यवसाय सोडून गेले आहेत.
मात्र आता यांची गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्रित येऊन
गाव बंद ठेवले आहेत आणि जोपर्यंत आरोपींना अटक होईपर्यंत आंदोलन माघार नसल्याचा इशारा
दिला आहे.
No comments:
Post a Comment