कुणा वाचून कुणाचे काही आडत नाही, हे जरी खरे असले, तरी कोण कधी उपयोगी पडेल, हे सांगता येत नाही. आयुष्यात कितीही मोठे झालात तरी,
छोट्यांना कधी विसरू नका. कारण, जिथे सुईचे काम असते, तिथे तलवार कधीच चालत नाही.
****
“विश्वास’’ किती हा छोटा शब्द आहे.... वाचायला सेकंद लावतो...
विचार करायला मिनिट लावतो... समजायला दिवस लावतो...
आणि सिद्ध करायला संपूर्ण आयुष्यचं लावतो...
****
एक दिवस एक 6 वर्षाची मुलगी
तिच्या आईसोबत मुंबई फिरायला गेली तेव्हा...
मुलगी : आई, हे विराट जडेजा रोहित कोण आहे गं ?
आई : बाळा हे क्रिकेटर
आहेत.
मुलगी
: आई, क्रिकेटर म्हणजे काय गं?
आई : अगं ते आपल्या
देशासाठी खेळतात.
मुलगी : मग त्यांचं इतकं
नाव का घेतात, इतकं कौतुक का करतात, त्यांच्याकडे
एवढे पैसे कसे?
आई
: अगं ते देशासाठी खेळतात ना म्हणून.
मुलगी : मग माझ्या बाबाचं
का कौतुक नाही होत? बाबाकडे कमी पैसे का असतात, माझे बाबादेखील वर्षातून 10 महिने बॉर्डरवर स्वत:चा जीव धोक्यात घालून खेळतच असतात ना !
आई
: बाळा आपण अशा देशात राहतो जिथे जिवाशी खेळणार्यापेक्षा बॅट बॉलने खेळणारा जास्त महत्त्वाचा मानला जातो.

No comments:
Post a Comment