विठ्ठल मंदिर व माता आदिशक्ती सेवाभावी
संस्थेच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन
जत,(प्रतिनिधी)-
जत येथील श्री विठ्ठल मंदिर हराळे समाज
आणि माता आदिशक्ती सेवाभावी संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील विठ्ठल मंदिरात नवरात्र
उत्सवानिमित्त विविध स्पर्धा आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सव सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,
असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.
शनिवार दि. 13 रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत वेशभुषा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. रविवारी दि. 14 रोजी रात्री 8 वाजता
ग्रुप दांडिया तसेच सोमवार दि. 15 रोजी रात्री 8 वाजता कपल दांडियाचे आयोजन केले आहे. यासाठी आकर्षक बक्षीसे
ठेवण्यात आली आहेत. बुधवार दि. 17 रोजी
होम हवन आणि पूजन असून शुक्रवार दि. 18 रोजी श्री देवीची मिरवणूक
काढण्यात येणार आहे.
रोज सकाळी 9 वाजता आणि सायंकाळी 7 वाजता आरती
आणि जोगवा आयोजित करण्यात आला आहे. विविध स्पर्धा आणि उपक्रम
पार पाडण्यासाठी माता आदिशक्ती सेवाभावी संस्था, श्री.
विठ्ठल मंदिर हराळे समाज आणि गुरू रविदास कला,क्रीडा
व सांस्कृतिक मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्य प्रयत्न करीत आहेत. या संस्थेच्यावतीने श्री देवी प्रतिष्ठापना करण्याचे हे दहावे वर्ष आहे.
ज्या भक्तांना देवीला माहेर व प्रसाद अर्पण करायचा असेल, त्यांनी 7038752548, 9156844144 आणि
8483914589 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे
संस्थेच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment