जत,(प्रतिनिधी)-
उमदी (ता. जत) येथे श्री भाऊसाहेब पीस फौंडेशन व पाठक ट्रस्ट,
मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार डॉ. एन.
आर. पाटील यांच्या 103 व्या
जयंतीनिमित्त मोफत वैद्यकीय शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य विक्रम सावंत यांच्या
हस्ते करण्यात आले. यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आप्पासाहेब
बिरादार, बाबासाहेब कोडग, माजी जिल्हा परिषद
अध्यक्ष रेशमाक्का होर्तीकर, लता कुल्लोळी, डॉ. आर. एन. पाठक, ए. आर. पाठक, एस. आर. पाठक, डॉ. अमेय पाठक, डॉ कुरणे, डॉ. श्रीकांत कुलकर्णी
डॉ. मुकुंद बार्शीकर उपस्थित होते. विक्रम
सावंत म्हणाले, आरोग्य विभागाच्यावतीने यापुढे आरोग्य तपासणी
शिबीर घेऊन रुग्णांना दिलासा देऊ.
No comments:
Post a Comment