Monday, October 8, 2018

संख येथील 'पिण्याच्या पाण्यासाठी'ची भारत निर्माण योजना पूर्ण करण्यास ग्रामपंचायत सक्षम

 सौ. मंगल पाटील यांची माहिती
 जत,(प्रतिनिधी)-
संख (ता. जत) येथील गावासाठी व वाडी वस्ती साठी सन २०११ साली मंजूर झालेल्या भारत निर्माण योजनेची कामे प्रगतीपथावर असून सर्व कामे पूर्ण करण्यासाठी संख ग्रामपंचायत सक्षम असून ही योजना करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत  अशी माहिती संख ता. जत येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ .मंगल रावसाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सौ. पाटील पुढे म्हणाले की, संख ता.जत येथील गावासाठी १९७२ सालची योजना कालबाह्य झाल्याने संख गावठाण व वाडी वस्तीला दहा वर्षे टँकरने पाणीपुरवठा केला जात होता सन २०११ साली संख गावासाठी व वाडी वस्ती साठी नळपाणी योजना मंजूर झाली. या योजनेसाठी संबंधित ठेकेदाराने शासन नियमाप्रमाणे साहित्य खरेदीसाठी जाहीर कोटेशन मागून साहित्य खरेदी करून व मंजुरी कामासाठी जाहीर निवेदन देऊन ही कामे सुरू केली यासाठी दरीबडची रस्त्यालगत चार लाख लिटर पाण्याचे उंच जलकुंभ बांधण्यात आले आहे तसेच ग्रामपंचायत संख पासून अंकलगी रस्त्या पर्यंत उंच जलकुंभ पर्यंत दाबनलिका  खुदाई पूर्ण करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पूर्ण केली आहे सध्या गावासाठी हे पाणी सुरू असून संपूणॅ गाव पाणी पित आहे तसेच वाडी वस्ती च्या नळ पाणीपुरवठा योजनेची भिवर्गी तलावाखालील विहिरीचे काम पूर्ण झाले आहे.
 दाबनलीकेचे  काम हे जवळजवळ तीन किलोमीटर पेक्षा जास्त पूर्ण झाले असून उर्वरित  काम प्रगतीपथावर आहे यासाठी 90 लाख रुपये ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा करण्यात आले असून मंजूर निधीपैकी 68 लाख इतका निधी जिल्हा परिषद सांगली कडून येणे बाकी आहे. संपूर्ण परिसरातील कामे ही अत्यंत चांगली झाली असून या कामाच्या खर्चाचे लेखापरीक्षण ही झालेली आहे .योजनेच्या सर्व साहित्याची गुणवत्ता ही तपासणी करून त्यांचे आहवाल  दप्तरी ठेवणेत आले आहेत. झालेल्या जमाखर्च व कामास ग्रामसभेने वेळोवेळी मान्यता दिली आहे.
 घोटाळा झाला नाही
संख गाव व वाङीवस्तीसाठी  वस्तीसाठी सुरू असलेल्या या योजनेतून सध्या गावाला वाडी वस्तीला पाणी मिळतआहे काही कामे थांबलेले असली तरी येत्या महिनाभरात ही कामे पूर्ण करणार असून काही  पदाधिकारी यात घोटाळा झाल्याचे आरोप करत असले तरी त्यात कोणतेही तथ्य नाही विनाकारण ग्रामपंचायतीला बदनाम करण्याचा उद्योग त्यांनी बंद करावा असे आवाहनही सरपंच सौ पाटील यांनी केले
ग्रामपंचायतीला जादा अधिकार
संख ता. जत या ग्रामपंचायत च्या माध्यमातून संख येतील गावठाण वाडी वस्ती साठी जी योजना सुरू झालेली आहे ती प्रगतीपथावर असून राहिलेले सर्व कामे महिन्याभरात आम्ही पूर्ण करणार असून नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाबद्दल जनतेची प्रशासनाची दिशाभूल करून स्वतःच्या स्वार्थासाठी योजनेलाखिळ घालून योजना बंद पाडण्याचा प्रयत्न काही जण करत असले तरी  ते यशस्वी होणार नाही . ही कामे पूर्ण करण्यास ग्रामपंचायत कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगून या योजनेची संपूर्ण कामे मार्गी लावू अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत दिली.

No comments:

Post a Comment