जत,(प्रतिनिधी)
सातारा रोडवरील ऐश्वर्या कृषी सेवा केंद्रासमोर विजेचा सिमेंट खांब डोक्यावर पडून राम वसंत सरगर (वय-30,रा.वाषाण ता.जत) हा हमाल जागीच ठार झाला. ही घटना आज सकाळी दहा वाजता घडली.प्रामाणिक आणि मेहनती राम यांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
या प्रकरणी जत पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, राम सरगर हे सकाळी दहा वाजता ऐश्वर्या कृषी सेवा केंद्रासमोर खते व कृषी औषधे ट्रकमधून उतरून घेण्यासाठी आले होते. ट्रक चालक गाडीमागे घेत असताना ती विजेच्या सिमेंट खांबाला धडकली. त्यामु़ळे सिमेंट खांब मोडून तिथेच खाली उभारलेल्या राम यांच्या डोक्यात पडला. डोक्याला जबर मार लागल्याने ते जागीच कोसळले आणि गतप्राण झाले. बाबासाहेब भीमराव सरगर यांनी या प्रकरणी जत पोलिसांत फिर्याद दिली.
राम यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. प्रामाणिक, गरीब आणि कष्टाळू राम यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment