जत पंचायत समितीच्या सभापती मंगलताई जमदाडे यांचा राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षांनी अखेर मंजूर केला असून आता त्यांच्या जागी प्रभारी सभापती म्हणून उपसभापती शिवाजी शिंदे काम पाहणार आहेत. सौ.जमदाडे यांनी चार दिवसांपूर्वी जि.प.अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला होता.
जत पंचायत समितीवर आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. समितीमध्ये भाजपाचे नऊ, कॉंग्रेस पक्षाचे सात तर एक जनसूराज्य पक्ष आणि एक सुरेश शिंदे यांच्या गटाचा सदस्य आहे. भाजपा आणि सुरेश शिंदे गट यांनी पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापन केली आहे. सव्वा वर्षे सभापती पदासाठी सौ.जमदाडे यांना संधी देण्याचे ठरले होते.त्यानुसार कालखंड संपल्याने पंधरा दिवसांपूर्वी सौ.जमदाडे यांनी आमदार जगताप यांच्याgकडे सोपवला होता. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी हा राजीनामा दि. 27 रोजी स्वीकारला. त्यानुसार आज सौ.जमदाडे यांनी आपल्या पदाचा कार्यभार उपसभापती शिवाजी शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी प्रकाश जमदाडे,श्रीदेवी जावीर, रवींद्र सावंत उपस्थित होते.
नव्या निवडीची उत्सुकता
नव्या सभापती, उपसभापतीच्या निवडीबाबत तालुक्यात उत्सुकता निर्माण झाली आहे. महानंदा तावंशी यांची सभापती पदासाठी तर ऍड.आडव्याप्पा घेरडे यांची उपसभापती पदासाठी नावे चर्चेत आहेत.भाजपाला पंचायत समितीमध्ये काठावर बहुमत असले तरी आमदार जगताप यांनी सत्तेची बांधणी मजबूत केली असल्याचे सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment