Monday, October 1, 2018

जिल्हाधिकाऱ्यांनी केली स्टॅम्प वेंडर यांची कान उघाडणी

जनतेला स्टॅम्प वेळेवर न दिल्यास परवाना रद्द
 जत,(प्रतिनिधी)-
सांगलीचे जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी आज जत तहसिल कार्यालयाला अचानक भेट दिली. मात्र त्यांच्याजवळ वेगळ्याच तक्रारी मिळाल्याने त्यांनी दुय्यम निबंधक आणि स्टम्प वेंडर यांची चांगलीच कान उघाडणी केली.
नवीन मतदार नोंदणीची पाहणी करण्यासाठी ते आले होते. मात्र यावेळी त्यांना  तहसिल  कार्यालयातील दुय्यम निबंधक कार्यालयासमोर गर्दी दिसली. यावेळी त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांची विचारपूस केली. नागरिकांनी   जिल्हाधिकारी आले आहेत, म्हटल्यावर त्यांना गराडाच घातला. मग त्यांनी समस्यांचा पाढाच वाचला. अनेकांनी  वेळेवर स्टॅम्प मिळत नाहीत, संगणक सतत  एरर येत असल्याचे सांगितले जाते. कार्यालयात वेळेवर खरेदी-विक्री होत नाही, अशा तक्रारी केल्या. तालुक्यातील स्टॅम्प वेंडर हे जागेवर नसतात. नागरीकांना स्टॅम्प  देत नाहीत,अशा तक्रारी केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी तातडीने सर्व स्टॅम्प वेंडरना बोलवून घेतले व यापुढे लोकांना वेळेवर स्टॅम्प द्या अन्यथा एक जरी लेखी तक्रार आली तर स्टॅम्प वेंडरचा परवाना रद्द करू इशारा देऊन जनतेची कोणतीही अडचण करू नका, असे सांगितले. नंतर त्यांनी नवीन मतदार नोंदणी विभागाची पाहणी केली. कामाची प्रगती पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.

No comments:

Post a Comment