जत,(प्रतिनिधी)-
जत येथील वळसंग रोडवरील तंगडी मळ्यात भिमाण्णा चनबसू मैगूर यांच्या घरात सोमवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरी केली .मैगूर कुटुंबीय सकाळी उठले असता बेडरुम मधील तिजोरी उघडी दिसल्याची निदर्शनास आली. या तिजोरीतील डबा व कपाटातील १०तोळे सोने व रोख रक्कम पन्नास हजार व पॅन्टच्या खिसातील ५ हजार रुपये व एक मोबाईल सर्व ऐवज मिळून तीन लाख बावीस हजार पाचशे चोरीस गेलेचे लक्षात आले. याबाबत भिमाण्णा चनबसू मैगूर यांनी जत पोलिसात फिर्याद दिली आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन कांबळे हे करीत आहे.
No comments:
Post a Comment