जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील
बनाळी येथील श्री बनशंकरी देवीची यात्रा बुधवार दि. 17 ऑक्टोबर रोजी
भरत आहे. असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या देवीच्या
दर्शनासाठी दूरवरून भाविक येत असतात.
डोंगरांच्या
कुशीत आणि हिरव्या गर्द झाडीच्या सानिध्यात वसलेल्या या देवीच्या स्थानाला पर्यटनस्थळ
म्हणून पाहिले जात आहे. जत तालुक्यात सर्वत्र दुष्काळाच्या खुणा दिसत असल्या
तरी या ठिकाणी मात्र
या दुष्काळाचा मागमूसही दिसत नाही. आंबा,चिंच, जांभूळ, पिंपळ वड अशा असंख्य
हिरव्यागर्द मोठ्या झाडांच्या सानिध्यात आणि थंडगार वातावरणात श्री बनशंकरी देवीचे
मंदिर आहे. सुमारे वीस-पंचवीस एकर क्षेत्रात
ही वनराई पसरलेली आहे.
दरवर्षी अश्विन शुक्ल अष्टमीला म्हणजेच दसर्याच्या आदल्या दिवशी यात्रा भरते. दि. 17 रोजी ही यंदाची यात्रा भरत असून भाविकांमध्ये या देवस्थानची जागृत दैवत म्हणून
ओळख आहे. नवरात्र काळात भाविक सकाळ-संध्याकाळ
आरतीला उपस्थित राहतात. उपवास करतात. नवरात्र
काळात या परिसरात मंगलमय वातावरण असते. जत परिसरासह लांबून भाविक
या ठिकाणी नित्यनेमाने येतात.
या देवतेमुळे संपूर्ण बनाळी गाव शाकाहारी
आहे. मांसाहार वर्ज्य असलेले संपूर्ण महाराष्ट्रातले हे एकमेव
गाव आहे. मांसाहार करणार्यावर देवीचा कोप
होतो, अशी पूर्वापार चालत आलेली श्रद्धा आहे. यात्रेच्या दिवशी मेवामिठाई, हॉटेल, खेळणी, प्रसाधने अशा अनेक वस्तूंची दुकाने थाटलेली असतात.
देवीची गावातून पालखी फिरते. यावेळी भाविक मोठ्या
संख्येने उपस्थित असतात.

No comments:
Post a Comment