जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील बोर्गी बुद्रक येथे रुपा आण्णाराया बिरादार (वय १७) ही तरुणी रानात जनावरे राखवयास गेली असता विहिरीत पाय घसरुन पडल्याने मयत झाली .ही घटना बोर्गी बुद्रक येथे सोमवारी दुपारच्या सुमारास घडली.याबाबत उमदी पोलिस ठाणे येथे मुलीचे वडील आण्णाराया बिरादार यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलिस फौजदार तानाजी भोसले हे करीत आहेत.
No comments:
Post a Comment