जत,(प्रतिनिधी)-
महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भक्तांचे
श्रद्धास्थान असलेल्या जत तालुक्यातील बनाळी येथील श्री बनशंकरी देवीची यात्रा मोठ्या
उत्साहात आणि विविध उपक्रमांनी पार पडली. देवस्थान
आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त नियोजनातून विविध धार्मिक कार्यक्रम विधीवत पार पडले
कुस्त्यांसह अन्य स्पर्धाही यात्रास्थळावर घेण्यात आल्या.
अश्विन शुद्ध अष्टमी या दिवशी श्री. बनशंकरीदेवीची यात्रा
दरवर्षी भरत असते. यादिवशी पहाटे उठून भक्तलोक देवीला दंडवत घालून
नवस फेडतात. दुपारी देवीची पालखी निघते. यात्रास्थळ आणि गावातून पालखी फिरते. यावेळी भाविकांनी
पालखीवर खारिक-खोबरे यांची उधळण केली.पालखीने
मंदिराभोवती प्रदिक्षणा घातली. हजारो भक्तांनी देवीचे दर्शन घेतले.
सायंकाळी यात्रा स्थळावर कुस्ती स्पर्धा
आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचे उदघाटन
माजी केंद्रिय मंत्री प्रतीक पाटील, आमदार विलासराव जगताप यांच्याहस्ते
झाले. यावेळी पंचायत समितीचे सभापती शिवाजी शिंदे, पंचायत समिती सदस्य रवींद्र सावंत, जि.प. चे माजी सभापती संजीवकुमार सावंत, जि.प. सदस्य सरदार पाटील,
माजी पंचायत समिती सदस्य सुनील पवार, अजिंक्यतारा
विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. प्रभाकर
जाधव, नगरसेवक निलेश बामणे, भैय्या कुलकर्णी,
मुन्ना पखाली, माणिक पाटील, धनाजी पाटील, आवंढीचे सरपंच अण्णासाहेब कोडग,
दीपक शिंदे, बाळासाहेब माने, लक्ष्मण्अ जखगोंड, दत्तात्रय सावंत, अरुण कोडग, संदीप काशीद, विनोद
कोडग, सदाशिव सावंत, एकनाथ भोसले,
कुलदीप चव्हाण, पांडुरंग सावंत, कृष्णा शेंडगे, राजू जेऊरकर, दिलीप
सोलापुरे, सलिम पाच्छापुरे, नागन्नाथ गायकवाड,
बबन बोराडे, राहूल सावंत, तात्यासाहेब वाघमोडे, डॉ. एम.एम. सावंत, हरिभाऊ सावंत,
राहूल पाटेल आदी उपस्थित होते.
यात्रा यशस्वी करण्यासाठी बनाळीचे सरपंच
विद्या सावंत, उपसरपंच साहेबराव माळी, देवस्थान समितीचे अध्यक्ष एम.एस.मोगली, सुनील कुलकर्णी, ए.एम. सावंत, नारायण सावंत,
ग्रामसेवक हुसेन पटेल, तलाठी निखिल पाटील,
कृष्णदेव माळी, श्रीकंत कोळी, बाळासाहेब कावडेबुवा, सुभाष सुर्वे आदींनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment