जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील उटगीजवळील निगडी बुद्रुक येथे नवरात्र उत्सवानिमित्त करण्यात
आलेल्या प्रसादातून सुमारे शंभर लोकांना विषबाधा झाली असल्याचे सांगण्यात आले.
काही जणांवर उमदी, उटगी व माडग्याळ येथील रुग्णालयांअध्ये
उपचार चालू आहेत तर काहींना उपचार करून सोडून देण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी
की, उत्सवानिमित्त शिर्याचा प्रसाद करण्यात आला होता.
हा प्रसाद खाल्ल्याने लोकांना विषबाधा झाली. काहींना
उलटी, मळमळ, जुलाब होऊ लागले. ही संख्या वाढत राहिल्याने या लोकांना सरकारी व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात
आले. या गावातील सुमारे शंभर लोकांना विषबाधा झाली आहे.
मात्र सध्या सर्व काही नियंत्रणाखाली असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी
श्री. पवार यांनी सांगितले.
दसर्याच्या दिवशी
गोडधोड आणि मांसाहारही केला जातो. खंडेनवमीला मांसाहार आणि दसर्याला गोड नैवेद्य असतो. कदाचित दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्याने
विषबाधा झाली असावी, अशी शक्यता वैद्यकीय अधिकार्यांनी व्यक्त केली आहे, मात्र याबाबतचा तपास सुरू आहे.
यासाठी अन्नभेसळ प्रतिबंधक विभागाला पाचारण करण्यात आले आहे.
याबाबत अधिक तपासणी आरोग्य विभागाकडून सुरू आहे. उमदी पोलिसांनाही याची कल्पना दिली असून पोलिसांकाडूनही चौकशी सुरू आहे.
No comments:
Post a Comment