जत,(प्रतिनिधी)-
दोन महिन्यांपूर्वीच
जत विभागाच्या पोलीस उपाधीक्षक म्हणून हजर झालेल्या श्रीमती शर्मिष्ठा वालावलकर यांची
पदोन्नतीवर बदली झालेली आहे. त्यांच्याकडे अमरावतीच्या नागरी
हक्क संरक्षण विभागाचे पोलीस अधीक्षक पदाची धुरा सोपविण्यात आली आहे.
राज्याच्या गृहमंत्रालयाने काही पोलीस अधिकार्यांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी काढले आहेत. त्यामध्ये
पोलीस उपाधीक्षकपदी कार्यरत असलेल्या अनेकांना सहाय्यक आयुक्त पदावर पदोन्नती देण्यात
आली आहे. या यादीत श्रीमती वालावलकर यांचा समावेश असून त्यांना
आता सहायक आयुक्तपदी बढती देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment