जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात
नवीन मतदार नोंदणीसाठी 280 बीएलओंची नियुक्ती करण्यात आली असून
यामध्ये प्राथमिक, माध्यमिक शिक्षक. तलाठी,
ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांची नेमणूक केली असून
आतापर्यंत एकोणीसशे नवीन मतदारांची नोंदणी झाल्याची माहिती प्रांताधिकारी तुषार ठोंबरे
यांनी पत्रकार बैठकीत दिली.
यावेळी
तहसीलदार सचिन पाटील उपस्थित होते. ठोंबरे म्हणाले, जत तालुक्यात यापूर्वी आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांना नवीन मतदारांची नोंदणी
करण्याची जबाबदारी दिली होती; मात्र त्यांच्याकडून समाधानकारक
कामगिरी झाली नसल्याने त्यांना वगळून प्राथमिक, माध्यमिक शिक्षक,
तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक
यांना 1 सप्टेंबर बीएलओ म्हणून नियुक्ती दिली आहे. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबरअखेर नवीन मतदारांची नोंदणी करायची
असून ज्यांचे वय 18 वर्षे पूर्ण झाले आहे, त्यांची नवीन मतदार यादीमध्ये नावे नोंद करण्यात येणार आहेत. जत तालुक्यातील शाळा-महाविद्यालयांमधून विशेष मोहिम राबवून
त्याच ठिकाणी नवीन मतदारांची नोंदणी केली जात आहे. आतापर्यंत
1900 नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे. आज
2 ऑक्टोबर रोजी जत तालुक्यातील सर्व गावात विशेष मोहीम आयोजित केली असून
सर्व बीएलओंनी उपस्थित राहायला सांगण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment