Monday, October 8, 2018

कुंभारीत विशेष पोलीस पथकाचा दारू अड्ड्यावर छापा

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील कुंभारी येथे विनापरवाना देशी  दारू विक्री अड्ड्यावर सांगलीच्या विशेष पोलीस पथकाने छापा टाकून सुमारे 21 हजार 400 रुपयांचा दारू साठा जप्त केला. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली असून दुसरा संशयीत आरोपी फरार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कुंभारी ग्रामपंचायती जवळच ज्ञानू चौगुले याचे पडके घर आहे.
या ठिकाणी बेकायदा देशी दारू उघडपणे विकली जात होती.अशोक जाधव हा अड्डा चालवत होता. याची माहिती सांगलीच्या विशेष पोलीस पथकाला मिळाली होती. त्यानुसार आज सोमवारी सायंकाळी चार वाजता पोलिसांनी छापा टाकला. यावेळी 180 च्या 274 देशी दारूच्या बाटल्या आणि दोन हजार 220 रुपये  रोख रक्कम असा मिळून 21 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी पोलीस नाईक मुदस्सर पाथरवट यांनी अड्डा चालक अशोक जाधव व सुरेश शंकर शिंदे या दोघांविरोधात जत पोलिसांत फिर्याद दिली. या प्रकरणी सुरेश शिंदे यास अटक करण्यात आली आहे.मात्र दारू अड्डा चालक अशोक जाधव हा फरार आहे. ही  कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय श्री.डोके,दीपक ठोंबरे, अरुण पाटील, सचिन जाधव, प्रियांका धुमाळ यांनी केली.

(जप्त करण्यात आलेल्या देशी दारूचे बॉक्स)

No comments:

Post a Comment