जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील संख येथे नुकतेच मोफत
आरोग्य तपासणी शिबीर पार पडले. याला लोकांचा चांगला
प्रतिसाद मिळाला. श्री. हुडेदलक्ष्मी नवरात्र
महोत्सव मंडख आणि सेवासदन लाइफ सुपरस्पेशालिस्टी हॉस्पीटल (मिरज)
यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी सहाशेच्यावर रुग्णांची तपासणी करण्यात आली.
सेवासदन सुपरस्पेशालिस्टी हॉस्पीटलचे
प्रमुख डॉ. रविकांत पाटील, डॉ. मलनगौडा पाटील, माजी जि.प. सदस्य बसवराज पाटील, डॉ.
साक्षी पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती
देवगोंडा बिराजदार, मल्लिकार्जून सायंगाव, सुजाता पाटील, नवरात्र मंडळाचे अध्यक्ष मल्लिकार्जून
बिराजदार यांच्यासह ग्रामस्थ, मंडळाचे सदस्य, डॉक्टर, कर्मचारी उपस्थित होते.
शिबिराच्या उदघाटनप्रसंगी बोलताना डॉ. रविकांत पाटील म्हणाले की, जत तालुका
दुष्काळी आहे. इथल्या लोकांना आरोग्यावर खर्च करणे परवडणारे नाही.
त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून आपण ही मोफत आरोग्य तपासणी शिबिरे
घेत असून यापुढे दरवर्षी संखला आरोग्य शिबीर घेऊ. रुग्णांना माफक
दरात, काहींवर मोफत उपचार केले जातील, असेही
त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment