जत,(प्रतिनिधी)-
जत पंचायत समितीच्या सभापती पदाचा मंगल
जमदाडे यांनी राजीनामा दिल्याने या पदासाठी 22 ऑक्टोबर रोजी नव्याने निवड होणार आहे. या निवडीचा कार्यक्रम
जत तहसीलदारांनी जाहीर केला आहे. यासाठी पंचायत समितीची विशेष
सभा बोलावण्यात आली आहे.
तहसीलदार सचिन पाटील यांनी सोमवारी दि. 22 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता
यासाठी विशेष सभा बोलावली आहे. सकाळी 11 वाजता नामनिर्देशपत्र सादर करणे,12:30 वाजता अर्जाची
छाननी होईल. दुपारी एक वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची वेळ देण्यात
आली आहे. आवश्यकता भासल्यास दुपारी दोन वाजता मतदान होईल.
यानंतर निवड जाहीर होईल.
सध्या पंचायत समितीवर भाजपची सत्ता आहे. उपसभापती पद राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे गटाकडे आहे.
हा गट विकास आघाडी म्हणून निवडणूक लढला होता. मंगल
जमदाडे यांनी त्यांना दिलेला सव्वा वर्षाचा कार्यकाल संपल्याने राजीनामा दिला आहे.
सध्या सभापतीचा प्रभारी कारभार उपसभापती शिवाजी शिंदे यांच्याकडे आहे.
सभापती पदासाठी संखच्या कविता खोत आणि बसरगीच्या महानंदा तावंशी इच्छूक
आहेत. आमदार विलासराव जगताप सभापतीपदासाठी कोणाला संधी देतात,
याची उत्सुकता लागली आहे.
No comments:
Post a Comment