सिंहासारखा बलशाली प्राणी तिचे वाहन आहे. म्हणून तिला ‘शेरोवाली’ असेही म्हणतात.
महाराष्ट्रात नवरात्रातील देवीचा उत्सव घरोघरी, तसेच देवीच्या देवळात होतो. गुजरातमध्ये छिद्र पाडलेल्या
घड्यात दिवा ठेवून त्याच्याभोवती फेर धरून गाणी म्हणतात. यालाच
‘गरबा’ असे म्हणतात. देवीचा
हा उत्सव संपूर्ण भारतात साजरा होतो; परंतु बंगालमध्ये या उत्सवाचे
प्रमाण सगळ्यात मोठे आहे. ‘दुर्गा’ ही बंगालमधील
कुलदेवता आहे. तेथे साधारणपणे एक हजार वर्षांपासून हा उत्सव
‘दुर्गापूजोत्सव’ म्हणून साजरा होतो. भाद्रपद महिन्यापासून या उत्सवाची तयारी चालू होते. या
उत्सवात दुर्गेच्या ‘चामुंडा’ रूपाची पूजा
होते. देवीची दहा हात असलेली मूर्ती बनवतात. सिंहावर बसलेली, महिषासुराला ती मारण्याच्या रूपात असते.
तिच्या दोन्ही बाजूंना गणपती, कार्तिक,
लक्ष्मी यांच्या मूर्ती असतात. देवीपुढे गायन,
वादन, खेळ इत्यादी कार्यक्रम होतात. दुर्गा या दिवसांत सासरहून माहेरी झालेली असते, असे बंगाली
लोक मानतात. म्हणून दिवाळीप्रमाणे नवे कपडे, दागिने, पंचपक्वान्ने करतात.
‘शैलपुत्री’
हे दुर्गादेवीचे पहिले रूप असून, पहिल्या दिवशी
शैलपुत्रीची व 2 वर्षांच्या कुमारिकेची पूजा करतात. शैल म्हणजे पर्वत. दक्षकन्या सती ही शंकराची पहिली पत्नी
होती. तिने यज्ञात आत्मदहन केल्यानंतर पर्वतराज हिमालयाची मुलगी
म्हणून जन्म घेतला. तिला पार्वती, वृषभारूढ,
हेमवती, आदिशक्ती असेही म्हणतात. ही देवी बैलावर आरूढ असून, वन्य जीवजंतूंची रक्षण करणारी
देवी आहे. ब्रह्मचारिणी हे दुर्गादेवीचे दुसरे रूप असून,
नवरात्रीच्या दुसर्या दिवशी या देवीची व
3 वर्षांच्या कुमारिकेची पूजा करतात. या देवीचे
रूप अतिशय देखणे असून पांढरे वस्त्र नेसलेली असून, उजव्या हातात
जपमाळ व डाव्या हातात कमंडलू आहे. या देवीने शंकर पती म्हणून
मिळावा, यासाठी कठोर तप केले. नवरात्रीच्या
द्वितीयेला ‘पिवळ्या’ रंगाचे वस्त्र देवीला
नेसवून वेशभूषा करतात. श्रीखंडाचा नैवेद्य दाखवावा आणि साखरेचे
दान करावे. यामुळे घरातील दुःखे नाहीशी होतात. नवरात्रात कुमारिकांना फार महत्त्व असते. एका कुमारिकेला
जेवू घातले, तर 10 सुवासिनींना जेवू घातल्याचे
पुण्य लाभते. वय 9 वर्षे ते 10 वर्षेपर्यंत मुलींना कुमारिका म्हणतात. ती नावे अशी-
कुमारी-2वर्षे, त्रिमूर्ती3वर्षे, कल्याणी-4 वर्षे,
रोहिणी-5 वर्षे, काली-6
वर्षे, चंडिका-7 वर्षे,
शांभवी-8 वर्षे, दुर्गा-9
वर्षे आणि सुभहा10वर्षे अशी सगळी नवरात्रीच्या
द्वितीयेची माहिती आहे.

No comments:
Post a Comment