जत,(प्रतिनिधी)-
राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत झालेल्या कामाबाबत
वरिष्ठ पातळीवर तक्रार स्वतः जिल्हा परिषद सदस्य म्हणून केली होती, त्यावेळी मंगल पाटील संख गावाच्या सरपंच नव्हत्या. त्यामुळे
त्यांनी शासकीय चौकशी बद्धल बोलण्याबाबत त्यांना अधिकार नाहीत. सरपंच व ग्रामसेवक यांचा प्रत्यक्षात काही संबंध नसताना ग्रामपंचायतीस टाळे
लावून गैरहजर राहणे योग्य नाही. चौकशी यंत्रणा त्यांचे काम ते
करत आहेत, अशी मिाहती प्रतिपादन संखच्या जिल्हा परिषद सदस्य रेखा
बागेली यांनी प्रसिध्दिपत्रकातून दिली.
ज्यावेळी जिल्हा परिषद सदस्य म्हणून कामाबाबत तक्रार
केली,
त्यावेळीमंगल पाटील सरपंच नव्हत्या; मग विरोधकांच्या
कामाच्याबाबत तक्रार केली असताना सरपंचांनी विरोधकांची वकिली करण्याचा उद्देश काय,
असा सवाल बागेली यांनी केला आहे. जिल्हा परिषद
सदस्य रेखा बागेली म्हणाल्या, संख (ता.
जत) येथील 20 वाड्या व
9 वस्त्या राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत झालेल्या कामाबाबत जिल्हा परिषद
सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व ग्रामीण
पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे निकृष्ट कामाबाबत योग्य प्रकारे
काम करण्याची मागणी केली असता संबंधितांनी मिरज तंत्रनिकेतन यांना काम तपासणी व गुण
नियंत्रणासाठी वेळोवेळी तांत्रिक सेवा पुरवठादार कंत्राटदार, पाणीपुरवठा समितीचा अध्यक्ष व सचिवांना कळवून देखील गैरहजर राहून तपास यंत्रणेला
सहकार्य केले नाही.
राष्ट्रीय
पेयजल योजना ही 5 वर्षांपूर्वीची असून त्यावेळी सत्ता ही विरोधकांकडे
होती पण आताच्या सरपंच व ग्रामसेवक यांचा त्या योजनेविषयी काही संबंध नसताना ग्रामपंचायतीस
कुलूप ठोकून गैरहजर राहणे योग्य नाही. प्रत्यक्षात जिल्हा परिषद
सदस्य म्हणून दर्जात्मक काम करून घेणे क्रमप्राप्त आहे, अशी सौ.
बागेली यांची आग्रही मागणी आहे.

No comments:
Post a Comment